मुंबई : राजहंस प्रतिष्ठान तर्फे ‘राजहंस व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत रोज सायंकाळी ७ वाजता नंदादीप विद्यालयाचे भाणुबेन नानावटी कलाघर, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व येथे ही व्याख्यानमाला होणार आहे. ही पाच दिवसीय व्याख्यानमाला असणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक पंडित डॉक्टर राजा काळे व संगीत रसिक व अभ्यासक प्राध्यापक केशव परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी पं. डॉ. राजा काळे यांचे ‘स्वराभिषेकी गानमुद्रा’, ७ नोंव्हेबर रोजी विजय जाधव यांचे ‘हरवलेले मुक्काम पोष्ट’, ८ ऑक्टोबर रोजी डॉ. महेश अभ्यंकर यांचे ‘आरोग्यदायी शतक पार’, ९ ऑक्टोबर रोजी अंबरीश मिश्र यांचे ‘शैलेंद्र और गुलजार शुध्दोंके शिल्पकार’ या विषयांवर व्याख्यान होणार आहे. १० ऑक्टोबर रोजी सौ. गीता कॅस्टलीनो यांची ‘पंखांना ओढ स्वप्नांची या विषयावर मुलाखत होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सौ. मेघा वागळे-जांबोटकर ही मुलाखत घेणार आहेत. या संपूर्ण व्याखानमालेचे सूत्रसंचालन श्रेया राजवाडे आणि कश्मिरा भूषण अवसरे करणार आहेत. व्याखानमालेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ९८२११४२५०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.