नागपूर : जातीय जनगणना होणार आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडली जाणार, असं विधान काँग्रेस नेते राहूल गांधींनी केलं आहे. राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून बुधवारी नागपूर येथे आयोजित संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, "जातीय जणगणनेतून सगळं काही स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक गरिब व्यक्तीला आपल्या हातात किती ताकद आहे, हे कळेल. ज्याप्रमाणे संविधान हे केवळ पुस्तक नसून जगण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे जातीय जणगणना ही एक विकासाची पद्धत आहे."
हे वाचलंत का? - "महान संत शरदचंद्रजी पवार यांनी..."; राज ठाकरेंचा हल्लाबोल
"काहीही झालं तरी जातीय जणगणना होणार आहे. जातीय जनगणना होणार आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत तोडली जाणार, हे देशातील जनतेने निश्चित केलं आहे. जातीय जणगणनेमुळे संविधान सुरक्षित राहिल. आपल्यासोबत कोणता अन्याय होतोय हे जेव्हा जनतेला कळेल तेव्हा ते संविधानाचं पुस्तक हातात घेतील. या देशात दररोज ९० टक्के लोकांसोबत अन्याय होतोय. त्याच्याविरोधात आम्ही सगळे लढा देत आहोत. यातील जातीय जणगणना आणि ५० टक्के आरक्षणाची भिंत या दोन पहिल्या पायऱ्या आहेत," असेही ते म्हणाले.