मुंबई : संविधानाच्या मारतात बाता, काँग्रेसचा एकूण विषयच खोटा, अशी टीका भाजपने काँग्रेसवर केली आहे. बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलनात उपस्थित झाले होते. यावेळी त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे लाल रंगाचे संविधानाचे पुस्तकही होते. मात्र, या पुस्तकाचा एक व्हिडीओ भाजपने शेअर केला असून यात हे पुस्तक आतून कोरेच असल्याचे दिसून आले आहे.
हे वाचलंत का? - "महान संत शरदचंद्रजी पवार यांनी..."; राज ठाकरेंचा हल्लाबोल
"संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है. मोहब्बत के नाम पर सिर्फ नफरत फैलाना है," अशी टीका भाजपने काँग्रेसवर केली. तसेच काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. पण राहुल गांधी लक्षात ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही, तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल," असा इशाराही भाजपने राहुल गांधींना दिला आहे.