मुंबई : हिंगणा मतदारसंघातील भाजपचे समीर मेघे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेने बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी एक पत्रक जारी करत याबद्दलची माहिती दिली. मनसेने याआधी इथे बिजाराम किनकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता समीर मेघे यांना पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - राहुल गांधींकडील लाल संविधानाचे पुस्तक कोरेच! भाजपकडून पोलखोल
"काही प्रशासकीय अडचणींमुळे बिजाराम किनकर यांची उमेदवारी मागे घेता आली नाही. यापुढे बिजाराम किनकर हे मनसेचे उमेदवार नाहीत. त्यामुळे मनसे हिंगणा विधानसभेत प्रचार करणार नाही," असे मनसेच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.