फेक नॅरेटिव्हच्या दुसऱ्या डायरेक्टर सुप्रिया सुळे - देवेंद्र फडणवीस

देेवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सभेतून घणाघात

    06-Nov-2024
Total Views |
 
Untitled 23
 
पिंपरी - चिंचवड :  राज्यातील फेक नॅरेटिव्हच्या दुसऱ्या डायरेक्टर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे असल्याचा मिश्कील टोला  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते चिंचवड येथील जाहीर सभेत बोलत असताना त्यांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर बुधवार ६ नोव्हेंबर रोजी टीका केली. 
 
पुण्यातील हिंजवडीतून अनेक प्रकल्प आणि उद्योग परराज्यात पळवण्यात आले आहेत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर केली होती. मात्र त्या वक्तव्याचा समाचार घेत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की उद्योग राज्याच्या बाहेर न जाता राज्यातच आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले. 
 
उद्योग राज्याबाहेर गेले नसून यापैकी १६ उद्योगांनी राज्याच्या विविध भागांत विस्तार केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हिंजवडी आयटीपार्क संबंधीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावर हिंजवडीला बदनाम करू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, फेक नेरेटिव्ह सेटप्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघात घातला.
 
एवढेच नाहीतर त्यानंतर फडणवीस म्हणाले की, येत्या काळात पुणे जिल्हा हा पवार साहेबांना विचारु शकतो की पवार साहेबांच्या ५० वर्षांमध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर का तयार झाले नाही? याचे उत्तर शरद पवारांना द्यावे लागेल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
यावेळी चिंचवडचे भाजप पदाधिकारी, मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, अश्विनी जगताप, अमित गोरखे,  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे योगेश बहल यावेळी सभेला उपस्थित होते.