लोकसभेतील चूक पुन्हा करू नका!

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

    06-Nov-2024
Total Views |

Chandrashekhar Bawankule
कामठी-मौदा : लोकसभा निवडणुकीत रामटेक क्षेत्रातून कॉंग्रेसचा खासदार निवडून दिल्याची चूक आपण सर्व भोगतो आहोत. आता अशी चूक पुन्हा करायची नाही. चांदा ते बांदा आणि काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत विकासाची गंगा वाहून न्यायची आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून कॉंग्रेसला जनतेचे कल्याण पाहवत नसल्याने अशा योजना बंद पाडण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे लोक कोर्टात गेले आहेत.
कामठी-मौदा विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या निवडणूक प्रचारात बुधवारी (दि. ६ नोव्हे.) मौदा तालुक्यातील कोदामेंढी, खात, रेवराल, धानला, चीरव्हा, मौदा बाबदेव आणि माथनी गावांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान त्यांनी दिवाळी मिलन, कार्यकर्ता भेट व भाजपा पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला.
महायुतीच्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या १५०० रुपयांमध्ये वाढ करून २१०० करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे कृषीपंपांचे बिल माफ करून त्यांना मोफत वीज देणार, नुकसान भरपाई, सर्वसामान्यांच्या वीजबिलची रक्कम ३० टक्के कमी करणार, अपंग, निराधारांच्या अनुदानात वाढ करण्यासह जनतेच्या हिताचे अनेक निर्णय भाजपा-महायुतीने घेतले आहेत. विरोधक योजना बंद करण्याचा प्रयत्न करीत असताना भाजपाचे कार्यकर्ते राज्यातील चौदा कोटी जनतेच्या सेवेसाठी लढत आहेत.
त्यांच्या प्रचार दौऱ्यात आमदार टेकचंद सावरकर, जि.प. सदस्य राधा अग्रवाल, जि.प. सदस्य शकुंतला हटवार, जि.प. सदस्य कैलास बरबटे, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष सदानंद निमकर, उदयसिंह (गज्जु) यादव, मौद्याच्या माजी नगराध्यक्ष भारती सोमनाथे, माजी गटनेते राजू सोमनाथे, मोरेश्वर सोरते, राहुल पोटभरे, परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष धर्मराज जांगळे, चांगो तिजारे, राहुल किरपान, गोपाल गिरमेकर, भगवान बावनकुळे, डॉ. निलीमा घाटोळे, सदानंद मेश्राम, विष्णु बावनकुळे, रुपाली ठाकरे, अशोक हटवार, विशाल सेलोकर, अमोल नरुले, रेवानंद देशमुख, अनिल पडोळे, मंगला देशमुख, विनोद कारेमोरे, विनोद गभणे, नेकसिंग केरवार, गायत्री बादुले, मंदा राखडे, उत्तम मेश्राम, रामू धांडे, पांडुरंग सेलोकर, नरेश बावनकुळे, तिलक दंढारे, प्रकाश मेश्राम, माधुरी वैद्य, चंदा गेडा, कैलास वैद्य, मुकेश अग्रवाल, विकास मदनकर, प्रियंका आंबिलढुके, बबिता खोब्रागडे, श्रीहरी थोटे, गुड्डू गिऱ्हीपुंजे, अरुण आकरे, मोहन धांडे, रमेश चरडे, चिंतामण सारवे, प्रशांत भुरे, श्वेता देवतळे, शिल्पा देवनेनी, पंढरी चरडे, मारोती साठवणे, मुरलीधर यर्लगड्डा, प्रमोद हारोडे, पुरुषोत्तम बावनकुळे, बाळ आंबिलढुके, निलकंठ भोयर, मुन्ना चलसानी, तिलकचंद दंढारे, विनायक सहारे, संजय ठोंबरे, मनीराम यादव, अंकित वाडीभस्मे, शरद भोयर, देवा बंसोड, लोकेश तिजारे, सुधाताई तिजारे, विद्याताई राजगिरे, देविदास ठोंबरे, अनिल भोंडे, चिंतामण सारवे, अशोक ठोंबरे, विलास ठोंबरे, शरद भोयर, युवा भूषण सावरकर, दीपक मानकर, रमेश कुंभलकर, सुनीता पाराशर, वर्षा मरघडे, देविदास कुंभलकर, महेश वैरागडे, अंशुल कुंभलकर, दिपक मानकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.