गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणी टळणार!

06 Nov 2024 18:45:46

Pradhan Mantri Vidyalayaxmi Yojana
 
नवी दिल्ली : पंतप्रधान विजयलक्ष्मी योजनेला (Pradhan Mantri Vidyalayaxmi Yojana) मंजूरी देण्यात आल्याची मंजूरी देण्यात आली आहे. बुधवारी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही हामीशिवाय आणि कोणतेही तारण न देता कर्ज दिले जाईल. परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने मोठी योजना मंजूर केली आहे.
 
 
 
कोणत्याही परदेशी संस्थेत शिक्षण संस्थेत प्रवेश घेणारा विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकेल, असे नरेंद्र मोदी सरकारने म्हटले आहे. या योजनेअंतर्गत, सरकार रुपये ७.५ लाखांपर्यंतच्या कर्जावर ७५ % हमी देण्यात आली आहे. शिवाय सरकार ८ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी रुपये १० लाखांच्या कर्जावरील व्याज ३ % ने कमी केले जाईल.
 
दरम्यान आता या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची कमाई रुपये ४.५ लाखांपर्यंत कमी केले असून व्याजदर पूर्णपणे माफ केले आहे. केंद्र सरकारने म्हटले की, या योजनेचा दरवर्षी २२ लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल.
 
Powered By Sangraha 9.0