ढाका : बांगलादेशात कट्टरपंथींसह पोलीसांनी हिंदू समाजावर अत्याचार केला आहे. हिंदू आणि त्यांच्या उपासकांवर टीका -टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना लक्ष केले आहे. ही घटना बांगलादेशातील चितगाव येथे मंगळवारी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली आहे. यावेळी पोलिसांनी हिंदूंवर आत्याचार केल्याचे वृत्त आहे.
प्रसारमाध्याच्या वृत्तानुसार, बांगलादेशात हजारी गोली येथे हिंदू समुदायावर पोलीस आणि लष्करासह इतर सुरक्षा यंत्रणांनी हल्ला केला. घटनास्थळी निष्पाप हिंदूंची झडती घेण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आले. यावेळी अनेक हिंदूंना पोलिसांनी पकडले असल्याचे वृत्त आहे. हिंदूंनी चितगावच्या एका मुस्लिम दुकानदाराविरोधात आवाज केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. उस्मान मुल्ला या कट्टरपंथी युवकाने सनातन धर्मावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्या दुकानाबाहेर हिदूंनी निदर्शने करत त्यांच्यावर कारवाईचे आदेश करण्याची मागणी केली आहे.
यानंतर उस्मानवर कारवाई करण्याऐवजी पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी हिंदूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्याने उस्मानला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले असून हिंदूंचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांच्या हल्ल्यात पाच हिंदू गंभीर जखमी झाले.
दरम्यान हिंदूंनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा बांगलादेशी सुरक्षा यंत्रणेने केला आहे. याप्रकणाचा संबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओत काही हिंदूंना अटक केल्याचे दिसत आहे. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फोडल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.
याप्रकरणात बांगलादेशातील १९ हिंदूंवर लष्करांनी एफआरआय दाखल केली आहे. शेख हसिना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर युनूस खान यांचे अंतरिम सरकार आल्यानंतर हिंदूंवरील अत्याचारास सुरूवात झाली आहे.