वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये वामनराव दाते स्मृती कोमसाप शाखा पुरस्कार पनवेल व लांजा शाखेला जाहीर

    05-Nov-2024
Total Views |
 
komsap
 
कोकण : कोमसापचे २०२३-२४ चे वाङमयीन आणि वाड्मयेतर पुरस्कार जाहीर झाले आहेत. वाड्मयेतर पुरस्कारांमध्ये वामनराव दाते स्मृती कोमसाप शाखा पुरस्कार पनवेल व लांजा शाखेला जाहीर झाला आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार नूतन बालशिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांना तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार प्रेमसागर गजानन मेस्त्री यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग मधील मालवण शाखेचे गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना, राजा राजवाडे स्मृती वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार मुंबईतील पार्ले शाखेचे अध्यक्ष संतोष खाडये व दादर शाखेच्या अध्यक्षा विद्या प्रभू यांना,ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार कणकवलीच्या सरिता पवार यांना तर सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार प्राजक्ता राडये रत्नागिरी यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृति काव्य पुरस्कार रत्नागिरीचे विजयानंद जोशी यांना, वामनराव दाते स्मृती कोमसाप शाखा पुरस्कार पनवेल व लांजा शाखेला आणि युवा विभागात काम करणार्‍या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याच्या जुईली अतितकर यांना जाहीर झाला आहे.