राज्यातील २८८ मतदारसंघातून ४ हजार, १४० उमेदवार रिंगणात

05 Nov 2024 18:08:34
EC

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील लढतींचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून २८८ मतदारसंघात ४ हजार, १४० उमेदवार ( Candidate )  रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २८८ मतदारसंघात दाखल केलेल्या एकूण उमेदवारी अर्जांपैकी ७ हजार, ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सोमवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २ हजार, ९३८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे अंतिमतः राज्यात एकूण ४ हजार, १४० उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

जळगाव शहर आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक २९, तर नंदुरबारच्या शहादा मतदारसंघात केवळ तीन उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघात नऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात १२, तर अजित पवारांच्या बारामतीत २३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईचा विचार करता, जोगेश्वरी पूर्व २२ आणि मानखुर्द शिवाजीनगरमधून सर्वाधिक २२, तर विलेपार्ले, चेंबूर आणि माहीम मतदारसंघात सर्वात कमी सहा उमेदवार मैदानात उतरले आहेत.

मुंबई शहर, उपनगरांतील विधानसभा निवडणुकीचे उमेदवार
धारावी

 डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड - इंडियन नॅशनल काँग्रेस
मनोहर केदारी रायबागे - बहुजन समाज पार्टी
राजेश शिवदास खंदारे - शिवसेना
अनंता संभाजी महाजन - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक
मनोज लक्ष्मण वाकचौरे - आपकी अपनी पार्टी पिपल्स
 
सायन कोळीवाडा
 
गणेश कुमार यादव - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कॅप्टन आर तमिल सेल्वन - भारतीय जनता पक्ष
विलास धोंडू कांबळे - बहुजन समाज पक्ष
संजय प्रभाकर भोगले - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मोहम्मद शब्बीर अब्दुल वारिस अन्सारी - एमआयएम

वडाळा

  कालिदास निळकंठ कोळंबकर - भारतीय जनता पक्ष
श्रद्घा श्रीधर जाधव - शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे)
स्नेहल सुधीर जाधव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जलाल मुख्तार खान - बहुजन महा पार्टी
मनोज मोहन गायकवाड - रिपब्लिकन सेना
 
माहीम
 
अमित राज ठाकरे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महेश बळीराम सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सदानंद शंकर सरवणकर - शिवसेना
सुधीर बंडू जाधव - बहुजन समाज पार्टी
फारुक सलिम सय्यद - बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी

वरळी

आदित्य उद्धव ठाकरे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद मुरली देवरा - शिवसेना
सुरेश कुमार मिश्रीलाल गौतम - बहुजन समाज पार्टी
संदीप सुधाकर देशपांडे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अमोल आनंद निकाळजे - वंचित बहुजन आघाडी

शिवडी

अजय विनायक चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बाळा दगडू नांदगावकर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मदन हरिश्चंद्र खळे - बहुजन समाज पार्टी
मिलिंद देवराव कांबळे - वंचित बहुजन आघाडी
मोहन किसन वायदंडे - स्वाभिमानी पक्ष

भायखळा

मनोज पांडुरंग जामसुतकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
यामिनी यशवंत जाधव - शिवसेना
वारिस अली शेख - बहुजन समाज पार्टी
फरहान हबीब चौधरी - पीस पार्टी
फैयाज अहमद रफीक अहमद खान - एआयएमआयएम

मलबार हिल

भेरुलाल दयालाल चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मंगल प्रभात लोढा - भारतीय जनता पक्ष
केतन किशोर बावणे - राईट टू रिकॉल पार्टी
सबीणा सलीम पठाण - एआय एम पॉलिटिकल पार्टी
अली रहीम शेख - अपक्ष

मुंबादेवी

अमीन पटेल - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शायना मनिष चुडासमा मुनोत - शिवसेना
परमेश मुरली कुराकुला - राईट टू रिकॉल पार्टी
मोहम्मद शुऐब बशीर खतीब - आझाद समाज पार्टी (कांशिराम)
मोहम्मद जैद मन्सुरी - ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत

कुलाबा

अर्जुन गणपत रुखे - बहुजन समाज पार्टी
अ‍ॅड. राहुल सुरेश नार्वेकर - भारतीय जनता पक्ष
हिरा नवाजी देवासी - इंडियन नॅशनल काँग्रेस
जीवराम चिंतामण बघेल - राष्ट्रीय समाज पक्ष
विलास हरी बोर्ले - लोकशाही एकता पार्टी

अंधेरी पश्चिम

 अमित साटम - भाजप
अशोक जाधव - काँग्रेस
पतितपावन नील - बसप

अंधेरी पूर्व

 ऋतुजा लटके - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कुंदन वाघमारे - बसप
मुरजी पटेल - शिवसेना
कौसर सैय्यद - राष्ट्रीय ओलेमा पार्टी

अणुशक्ती नगर

 नवीन आचार्य - मनसे
फहाद अहमद - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
सना मलिक - राष्ट्रवादी

कलिना

 अमरजित सिंह - भाजप
संदीप हुटगी - मनसे
संजय पोतनीस - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

कांदिवली पूर्व

 अतुल भातखळकर - भाजप
कालू बुधेलिया - काँग्रेस
महेश फरकासे - मनसे
वेणूगोपाळ - बसप

कुर्ला

 मंगेश कुडाळकर - शिवसेना
प्रदीप वाघमारे - मनसे
प्रविणा मोरजकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पुंडलिक मोरे - बसप
अविनाश बर्वे - राष्ट्रीय ओलमा काऊन्सिल
आसमा शेख - एमआयएम

गोरेगाव

 अमोल सावंत - बसप
विद्या ठाकूर - भाजप
विरेंद्र जाधव - मनसे
समीर देसाई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

घाटकोपर पश्चिम

 गणेश चुक्कल - मनसे
राम कदम - भाजप
सुरेश विद्यागर - बसप
संजय भालेराव - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सागर गवई - वंचित

घाटकोपर पूर्व

 संदीप कुलथे - मनसे
राखी जाधव - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
पराग शहा - भाजप
सुनिता गायकवाड - वंचित
हुसैन शेख - स्वाभिमानी पक्ष

चांदिवली

 नसीम खान - काँग्रेस
दिलीप लांडे - शिवसेना
महेंद्र भानुशाली - मनसे
गफ्फार सैय्यद - एमआयएम

चारकोप

दिनेश साळवी - मनसे
यशवंत सिंह - काँग्रेस
योगेश सागर - भाजप
दिलीप लिंगायत - वंचित

चेंबूर

 अनिता पाटोळे - चेंबूर
तुकाराम काते - शिवसेना
प्रकाश फातर्फेकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
माऊली थोरवे - मनसे
आनंद जाधव - वंचित
दीपक निकाळजे - आरपीआय (ए)

जोगेश्वरी पूर्व

अनंत नर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
तैय्यबअली शेख - बसप
भालचंद्र अंबुरे - मनसे
मनिषा वायकर - शिवसेना
परमेश्वर रणशूर - वंचित

दहिसर

 विनोद घोसाळकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मनिषा चौधरी - भाजप
राजेश येरुणकर - मनसे
सतिश शरणागत - बसप

दिंडोशी

श्यामप्रसाद कनौजिया - बसप
भास्कर परब - मनसे
सुनील प्रभू - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
संजय निरुपम - शिवसेना

बोरिवली

संजय उपाध्याय - भाजप
कुणाल माईणकर - मनसे
संजय भोसले - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
किसन इंगोले - बसप

भांडुप

अशोक पाटील - शिवसेना
रमेश कोरगावकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रवी थाटे - बसप
शिरीष सावंत - मनसे
विठ्ठल यमकर - रासप

मागाठाणे

उदेश पाटेकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
नयन कदम - मनसे
प्रकाश सुर्वे - शिवसेना
राजेश मल्लाह - बसपा
दीपक हानवते - वंचित

मानखुर्द शिवाजीनगर

 जगदीश खांडेकर - मनसे
नवाब मलिक - राष्ट्रवादी
सुरेश विद्यागर - बसप
सुरेश पाटील - शिवसेना
अबू आझमी - सपा
आतिक खान - एमआयएम

मालाड पश्चिम

अस्लम शेख - काँग्रेस
विनोद शेलार - भाजप
क्रील डिसोझा - बसप
अजय रोकडे - वंचित

मुलुंड

मिहिर कोटेचा - भाजप
राकेश शेट्टी - काँग्रेस
सिद्धेश आव्हाड - बसप
नितिन कोळेकर - रासप
प्रदीप शिरसाठ - वंचित

वर्सोवा

भारती लव्हेकर - भाजप
संजय पाटील - बसप
संदेश देसाई - मनसे
हारुन खान - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

वांद्रे पश्चिम

आशिष शेलार - भाजप
आसिफ झकारिया - काँग्रेस
एजाज कुरेशी - बसप

वांद्रे पूर्व

अजय कापडणे - बसप
झिशान सिद्दिकी - राष्ट्रवादी
तृप्ती सावंत - मनसे
वरुण सरदेसाई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शंकर गावकर - संभाजी ब्रिगेड

विक्रोळी

विश्वजित ढोलम - मनसे
सुनिल राऊत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सुवर्णा करंजे - शिवसेना
हर्षवर्धन खांडेकर - बसप
अजय खरात - वंचित

विलेपार्ले

पराग अळवणी - भाजप
जुईली शेंडे - मनसे
संदीप नाईक - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
संतोष अंबुलगे - वंचित

Powered By Sangraha 9.0