नेटकऱ्यांनो सावधान! गैरहिंदू मजकूरांवर आता पवन कल्याणची करडी नजर

04 Nov 2024 13:56:35

Pawan Kalyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sanatan Dharma Wing)
सनातन धर्माच्या रक्षणासाठी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी आपल्या पक्षांतर्गत स्वतंत्र विंगची स्थापना केली आहे. 'नरसिंह वाराही विंग' असे त्याचे नाव असून याद्वारे सोशल मीडियावर सनातनचा अपमान करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
पवन कल्याण म्हणाले की, “मी सर्व धर्मांचा आदर करतो, पण मी माझ्या श्रद्धेवर ठाम आहे. सोशल मीडियावरून सनातन धर्माबाबत द्वेष पसरवणाऱ्या किंवा अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे सनातन धर्माच्या रक्षणासाठी मी माझ्या पक्षात ‘नरसिंह वाराही विंग’ नावाची शाखा स्थापन करत आहे.” तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडूंमध्ये भेसळ होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पवन कल्याण यांनी या विंगची स्थापना केली आहे.

Powered By Sangraha 9.0