दिशाभूल करू नका! सिद्धू दामपत्य पुन्हा अडचणीत

30 Nov 2024 13:38:02

sidhu

नवी दिल्ली : आपल्या अतरंगी कोमेंटरीने लोकांची मनं जिंकणारा नवज्योत सिंह सिद्धू आता चांगलच अडचणीत आला आहे. लिंबू पाणी आणि कच्ची हळद यासारख्या आयुर्वेदिक उपचारांनी कॅन्सर बरा होत असल्याचा दावा केल्यानंतर छत्तीसगढ सिव्हील सोसायटीने सिद्धू दामप्तयाला नोटीस पाठवला आहे. ८५० कोटी रूपयांचा दावा सिद्धू दामप्तयावर ठोकण्यात आला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी दावा केला होता की काही पारंपारिक उपचारांनी त्यांच्या पत्नीला कर्करोगाच्या ४थ्या टप्प्यातून बरे होण्यास मदत मिळाली होती. सिद्धू यांच्या दाव्याची सवर्त्र चर्चा झाली. केवळ ४० दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना पारंपारिक उपचारांच्या मदतीने आपली बायकोचा जीव वाचल्याचा दावा केला होता. कर्करोगाच्या उपचारांच्या दाव्याबद्दल छत्तीसगड सिव्हिल सोसायटी (CCS) द्वारे ८५० कोटी रूपयांची नोटीस सिद्धू दाम्पत्याला पाठवण्यात आली. या संदर्भात बोलताना छत्तीसगड सिव्हिल सोसायटीचे संयोजक कुलदीप सोलंकी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली की " अशा प्रकारचे खोटे दावे करत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. उपचारांबद्दलचा अविश्वास इतका वाढतो की कर्करोगाच्या रुग्णांना त्यांची औषधे घेणे बंद करण्यास भाग पाडले जाते ज्यामुळे त्यांचा मृत्यूचा धोका वाढतो."

वैद्यकीय व्यवसायातील व्यावसायिकांनी सिद्धूच्या या दाव्यावर नाराजी व्यक्त केली असून समाजमाध्यमांवर देखील टिकेचा सूर बघायला मिळतो आहे.

Powered By Sangraha 9.0