भगवान बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा यांचे निधन
30-Nov-2024
Total Views |
मुंबई : आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा (वय ४५) यांचे शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले. रांची येथील ‘राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (रिम्स) रुग्णालयात त्यांनी मध्यरात्री १२.३० वा. अखेरचा श्वास घेतला. मंगल मुंडा ( Mangal Munda ) यांचे बंधू कानू मुंडा यांनी सोशल मीडियावरून निधनाची वार्ता दिली.
दि. २५ नोव्हेंबर रोजीच्या रात्री खुंटी येथे झालेल्या रस्ता अपघातात मंगल मुंडा गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर ‘रिम्स’ रुग्णालयात विशेष टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मंगल मुंडा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
जनजाती समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांचे निधन हे अत्यंत दुःखद आणि संपूर्ण जनजाती समाजाचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना.
योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
मंगल मुंडा यांच्या निधनाचे अतीव दु:ख
भगवान बिरसा मुंडा यांचे वंशज मंगल मुंडा यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर झारखंडच्या जनजातीय समाजाचेही कधीही भरून न येणारे नुकसान आहे. या दुःखाच्या प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो. ओम शांती...