सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवा : धर्मपाल मेश्राम
30-Nov-2024
Total Views |
नवी मुंबई : “समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना अत्यंत महत्त्वाच्या असून त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न करावे,” अशा सूचना ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगा’चे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) धर्मपाल मेश्राम ( Meshram ) यांनी केले.
‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगा’चे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी कोकण भवन येथील समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभागीय कार्यालयात सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणार्या विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज कल्याण, मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी उपस्थित होते.
या बैठकीत मुंबई विभागात सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणार्या शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, सैनिकी शाळा, अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) ‘सुधारीत अधिनियम २०१५’ अंतर्गत घडलेल्या अत्याचार पीडित व्यक्ती व कुटुंबीयांना दिलेले आर्थिक साहाय्य व पुनर्वसन, औद्यागिक सहकारी संस्था इत्यादी योजनांच्या खर्चाचा मेश्राम यांनी आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी “सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावे, जेणेकरून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल. तसेच, योजनांचा खर्च १०० टक्के करावा,” असेही यावेळी मेश्राम यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या.