'हम दो हमारे चार' तृणमूल काँग्रेस नेत्याचे लोकसंख्या वाढ जिहादला प्रोत्सहान

व्हिडिओ होतोय व्हायरल

    30-Nov-2024
Total Views |

Population Jihad 
 
कोलकाता : भाजप नेते सुवेंद्र अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस नेत्याने सिद्दीकुल्ला चौधरी यांचा चीनला येणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी उपाय म्हणून लोकसंख्या वाढीच्या माध्यमातून लोकसंख्या वाढ जिहादला प्रोत्सहान केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल सरकारमधील कॅबिनेट मंत्री, सिद्दीकुल्लाह यांनी हम दो हमारे चार या लोकसंख्या वाढीच्या माध्यमातून लोकसंख्या जिहादचा प्रसार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
 
जर आपल्याला चीनशी लढायचे असेल, तर आपल्याकडे सारखीच लोकसंख्या असणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आधीच चीनला मागे टाकत असताना लोकसंख्या वाढ जिहादला प्रोत्सहान मिळाले आहे.
 
वक्फ कायद्यातील दुरूस्तीला विरोध करणारे सिद्दीकुल्ला चौधरी यांनी याप्रकरणी दावा केला की, ग्रामीण भागात जोडप्यांना अधिक मुले जन्माला घालायची. दरम्यान ही बातमी केवळ हिंदू मुस्लिम असण्यापूर्तीच मर्यादित नाही.
 
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याचा व्हिडिओ शेअर केला असून ते निदर्शनास आणून दिले. दुर्दैवाने, ममता बॅनर्जींच्या सरकारचे एक वरिष्ठ मंत्री लोकांना अधिक मुलं जन्माला घाला असे भरविधानसभेत सांगितले.
 
भारतात एका विशिष्ट समाजाच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने प. बंगालसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. ज्याभागात असंख्य रोहिंग्या आधीपासून बनावट कागदपत्र बनवत वास्तव्यास आहेत. यामुळे अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. हिंदू समाजासाठी हे लोकसंख्याशास्त्रीय दुरूस्तीसाठी हे एक बुरखाबंद आवाहन का आहे? असा सवाल करण्यात आला. सुवेंदू अधिकारी यांनी मोदी सरकारला देशव्यापी लोकसंख्या नियंत्रण विधेयक लागू करणार असल्याचे आवाहन केले आहे.