ढाका : बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेमुळे बांगलादेशी हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील एका विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तिरंग्यावरून विद्यार्थ्यांना चालण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे तिरंग्याचा अवमान झाल्याची घटना आहे. याप्रसंगी आता कोलकाता स्थित येथे असलेले प्रख्यात प्रसूती - स्रीरोग तज्ञ डॉ. इंद्रनील शाहा यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ते सध्या बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नसल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी माहिती दिली आहे.
फेसबुक १.४८ लाख फॉलोअर्स असल्याचा दावा करणारे डॉ. शाहा म्हणाले की, सध्या मी बांगलादेशातील रुग्णांना पाहणार नाही. माझे प्रथम राष्ट्रप्रेम आहे आणि नंतर मी माझा व्यवसाय-उत्पन्नाचा विचार करेल. पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशात हिंदुवरील अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात वाढ झाली आहे. बांगलादेशी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रवेशाद्वाराजवळ राष्ट्रध्वज जमिनीवर ठेवला असून त्यावरून काही विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचा अवमान करत तिंरग्यावरून चालण्यास प्रवृत्त केले जात असल्यचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेजारील देशाकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने डॉ. इंद्रनील शाहा व्यथित झाले होते की, त्यांनी बांगलादेशी रुग्णांवर उपचार करण्यासाठी विरोध दर्शवला आहे.