नमाज अदा केल्यानंतर बांगलादेशात कट्टरपंथींकडून २२ मंदिरांवर दगडफेक

30 Nov 2024 12:14:30
 
Bangladesh
 
ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हकलण्यात आल्यानंतर आता बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहेत. अशातच २९ नोव्हेंबर रोजी शुक्रवारची नमाज अदा झाल्यानंतर बांगलादेशात हिंसक वातावरण तयार झाले आहे. इस्लामवाद्यांनी पुन्हा हिंदू धर्मस्थळांना लक्ष केले आहे. अतिरेक्यांनी हिंदू देवी - देवतांच्या मूर्तींनाही सोडले नाही. त्यांनी मंदिरात असलेल्या मूर्तींवर दगडफेक केली. यावेळी हिंदूंवर हल्ले झाल्याची धक्कादायक घटना आहे. त्यामुळे नागरिकांना वाचवण्यासाठी धाव घ्यावी लागली.
 
शुक्रवारी चितगाव कोतवाली पोलीस ठाणे परिसरात असलेल्या हिंदूंच्या दुकानांना आग लावण्यात आली होती. काही लोकांच्या घरांनाही आग लावण्याचा प्रकार घडला आहे. शांतनेश्वरी मातृ मंदिर, शनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीबारी मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. हल्ल्यादरम्यान हिंदूंनी लष्कर आणि पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
 
शांतीनेश्वरी मंदिर व्यवस्थापन समितीचे स्थायी सदस्य तपन दास यांनी स्थानिक प्रसारमाध्यमाला सांगितले की, जम्माच्या शुक्रवारी नमाज आदा झाल्यानंतर लोकांनी मोर्चा काढला होता. त्यांनी हिंदुविरोधात आणि इस्कॉनविरोधी घोषणा देण्यास सुरूवात केली. हल्लेखोरांनी मंदिरावर हल्ला करून विटा आणि दगडफेक केली. त्यांनी शनि मंदिर आणि काली मंदिराची तोडफोड केली आणि दुकानांना लक्ष करण्यात आले होते.
 
ज्या भागात हल्ले झाले ते हिंदूबहुस भाग आहेत. येथील ९० टक्के लोकसंख्या हिंदू आहे. सत्ता उलथून टाकल्यानंतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या भीतीने समाजातील अनेक लोकांनी परिसर सोडला आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार उलथून टाकल्यानंतर बांगलादेशमध्ये २०० हून अधिक हिंदू मंदिरांना लक्ष्य करून त्यांची विटंबना करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0