रवी शर्मा नावाचा वापर करत सलीमचे भारतात बेकायदेशीर वास्तव्य

30 Nov 2024 19:00:03
 
Salim Matabbar
 
कोलकाता : एका बांगलादेशी नागरिकाला भारतात बेकायदेशीर बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. सलीम मातब्बर नावाचा कट्टरपंथी रवी शर्मा नावाचा वापर करत दोन वर्षांपासून भारतात वास्तव्यास होता. तो कोलकाता येथील मार्क्विस स्ट्रीट येथे एका हॉटेलात काम करत आपला उदरनिर्वाह करायचा.
 
पार्क स्ट्रीट पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी कोलकाता येथील बेनियापुकुर परिसरातून सलीम मातब्बरला ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करत याप्रकरणात लक्ष घालत पर्दाफाश केला आहे.
 
मातब्बर यांनी याप्रकरणाबाबत दावा केला की, बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीचे माजी नेते दोन वर्षापूर्वी कोलकाता येथे आले होते. सलीम मातब्बर यांनी सांगितले की, तो बांगलादेशातील मदारीपूरचा आहे. त्याच्या राजकीय संलग्नतेमुळे छळाच्या भितीने तो भारतात पळून आला.
 
भारतात आल्यानंतर त्याने बनावट ओळखपत्रे मिळवली आणि मूळ पासपोर्टही मिळवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घालत त्यांच्याविरोधात फॉरेनर्स अॅक्ट आणि संबंधित कलमान्वये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
मिळालेल्या वृत्तानुसार, कर्नाटक पोलिसांनी चित्रदुर्गातून सहा बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्याचे नाव समोर आल्यानंतर ही धाड टाकण्यात आली होती. शहरातील कापड कारखान्यात काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना बनावट कागदपत्रे पुरवण्यात आल्याच्या प्रकरणावरून पोलिसांनी अर्नब मंडल नावाच्या एका भारतातील नागरिकाला अटक केली आहे.
 
याप्रकरणामध्ये एका आठवड्यात कर्नाटकात शेख शैपूर रहमान, मोहम्मद सुमन होसेन अली, मजहरूल मारूफ, अजीझुल शेख, मोहम्मद, सादिक सिकंदर आणि सनोवर हुसैन यांना अटक करण्यात आली आहे. 
 
Powered By Sangraha 9.0