जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार रमेश करमरकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

30 Nov 2024 12:39:19
 
photography
 
मुंबई : छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन बुधवार ४ डिसेंबर पासून १० डिसेंबर पर्यंत मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रेक्षकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. ‘निसर्गाची विविध रुपे’ असा या छायाचित्रप्रदर्शनाचा विषय आहे. रमेश करमरकर यांनी देशातील आणि परदेशातील निसर्गाची आपल्या कॅमेरातून टिपलेली विविध रुपे या प्रदर्शनात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
 
रमेश करमरकर हे गेली ५० वर्षे फोटोग्राफी करत आहेत. राज्य पुरस्कारासोबतच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या छायाचित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शनेही भरली आहेत.
Powered By Sangraha 9.0