जयपूर : विवाह घरातील युवतींसोबत करा. कारण शिक्षित मुली या बेशिस्त आणि बेजबाबदार असतात, असे वक्तव्य करणारे इस्लामचे धर्मगुरू मौलवी मुफ्की तारिक मसूद यांनी इस्लाम धर्मातील युवतींबाबत गरळ ओकली आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही मुफ्ती यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ते यासाठी प्रसिद्धीझोतात असतात.
याप्रकरणाचा व्हिडिओ द जयपूर डायलॉग या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते पुढे म्हणाले की, अल्लाहने महिलांना घरातील राहणारी महिला असे संबोधले होते. तुम्ही याप्रकरणावर भांडू नका, तुम्ही ठरवा की आमची पत्नी नोकरी करणार नाही. आपण अशा व्यक्तीसोबत विवाह करा की त्या व्यक्तीने आपले आयुष्य आपल्यासोबत घालवले पाहिजे, त्या व्यक्तीने नोकरी करू नये.
पुढे ते म्हणाले की, आपण अशा मुलीशीं विवाह केला पाहिजे ज्या केवळ चार भिंतीत राहतील. माझा शिक्षणाला विरोध नाही. पण शिक्षण घेत असताना महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींची सेटींग लावली जाते. यामुळे महाविद्यालयात शिक्षण दिले जाणार नाही. शिक्षण घेतलेल्या युवतीसोबत जर आपण विवाह केला तर ती युवती मुलांचे पालपोषन करण्यास कमी पडेल. ती म्हणेल की, मी केवळ मौज मजा करण्यासाठी शिक्षण घेतले होते. आता मुला-बाळांच्या शाळेचे शुल्क आता तूच भर, असे मौलवी मुफ्ती यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य करत गरळ ओकली आहे.