अखेर महायूती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर!

चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

    30-Nov-2024
Total Views |
 
Mahayuti
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीतील दणदणीत विजयानंतर अखेर महायूती सरकारच्या अधिकृत शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत शपथविधीच्या तारखेची घोषणा केली.
 
 
 
हे वाचलंत का? -   सुप्रिया सुळे राजीनामा देणार का? राहुल नार्वेकरांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.