चिन्मय कृष्ण दास यांच्या पाठीशी इस्कॉन खंबीर

30 Nov 2024 13:32:24

ISKCON supports Chinmaya Krishna Das

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (ISKCON supports Chinmaya Krishna Das) 
बांगलादेश सरकारद्वारा अटक करण्यात आलेले हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत इस्कॉनने नुकत्याच जारी केलेल्या एका एक निवेदनातून स्पष्ट केले आहे. इस्कॉनने त्यामध्ये म्हटले आहे की, चिन्मय कृष्ण दास यांच्यापासून इस्कॉन कोणत्याही प्रकारे दूर झाले नसून, बांगलादेशातील अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या सर्व हिंदूंना संघटनेचा पाठिंबा आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत! : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

इस्कॉनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू आणि मंदिरांचे रक्षण करण्यासाठी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास यांच्या हक्क आणि स्वातंत्र्याचे समर्थन करण्यापासून इस्कॉनने स्वतःला कधीच दूर केले नाही व ते करणारही नाही. आम्ही इतर सर्व सनातनी संघटनांसह हिंदूंच्या सुरक्षेला आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांसोबत शांततापूर्ण वातावरण पुन्हा प्रस्थापित करण्यास समर्थन देतो."



वास्तविक बांगलादेश इस्कॉनचे सरचिटणीस चारू चंद्र दास यांनी एका पत्रकार परिषदेत इस्कॉन चिन्मय प्रभूंच्या वक्तव्याची किंवा कृतीची जबाबदारी घेणार नाही असे म्हटल्यामुळे देशभरातील हिंदू समुदायाकडून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर इस्कॉनने निवेदन जारी करत, चारू चंद्र दास यांच्या विधानाचा विपर्यास झाला असून चिन्मय कृष्ण दास यांना त्यांच्या पदांवरून आणि इस्कॉनमधील सर्व संघटनात्मक क्रियाकलापांवरून काढून टाकण्यात आले आहे मात्र इस्कॉन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0