चेन्नई : तमिळनाडू येथे फेंगल चक्रीवादळ आल्याने दि : ३० नोव्हेंबर २०२४ रोजी शनिवारी सायंकाळी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही वेळांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही सेवा बंद करण्यात येणार असल्याची माहिती चेन्नई एअरपोर्ट या ,” इंडिगोच्या X पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
चक्रीवादळाआधी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहणार असल्याने, रात्री पुद्दुचेरीजवळील कराईकल आणि महाबलीपुरम किनारपट्टीच्या दरम्यान ओलांडणे अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. चेन्नई तमिळनाडू येथे सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी याप्रकरणाची माहिती आधीच जारी केली. यापूर्वी इंडिगो एअरलाइन्सने चेन्नईला येणारी सर्व उड्डाणे वळवली होती.
चेन्नईमध्ये फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, शहराकडे जाणारी उड्डाणे वळण्यात येत आहेत. आमचे पथक आणि विमानतळ कार्यसंघ याकाळामध्ये सर्व शक्य समर्थनार्थ सहाय्यता करण्यासाठी समर्पित आहेत. तुमच्या संयमाची आणि समजूतदारपणाची आम्ही मनापासून प्रशंसा करत असल्याचे X ट्विट इंडिगोच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पुद्दुचेरी किनारपट्टीवरील सुरक्षा देखील वाढवली आहे. कारण पुद्दुचेरी येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक, कलेवनन यांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यांना भेट दिली आहे. तमिळनाडूच्या चेन्नईमधील मरीना बीच, पट्टीनापक्कम आणि एडवर्ड इलियट बीचसह समुद्रकिनाऱ्यांना भेट न देण्याचा सल्ला दिला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुद्दुचेरीतील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत.
याप्रकरणी आता 'फेंगल' चक्रीवादळ आणि IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ३० नोव्हेंबर २०२४ रोजी १२३० ते १९०० पर्यंत चेन्नई विमानतळाचे कामकाज सुरक्षेच्या कारणास्तव थांबवले जाईल. आम्ही शिफारस करतो की प्रवाशांनी त्यांच्या फ्लाइट्सबाबत संबंधित एअरलाइन्सकडे तपास करा, असे ट्विट करत चेन्नई एअरपोर्टने माहिती दिली आहे.