मुंबई : काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला बदनाम करण्याची मोहीम काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सुरु केली आहे. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुत्रा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाला शिवी देणे म्हणजे संविधानात्मक संस्थेचा अपमान करणे आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
हे वाचलंत का? - माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा कपोलकल्पित! खासदार मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
मात्र, भाई जगताप यांनी आपल्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाची माफी मागण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे आता भाई जगताप यांच्यावर काही कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.