सिडकोच्या भूखंडांवर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई

30 Nov 2024 13:53:20

CIDCO
नवी मुंबई, दि.२९: सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर आणि भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत आहे. या डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे.

अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली सिडकोकडूनकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना अधिकाऱ्यांना डम्पर चालक फुलचंद राममिलन साहनी हा व्यक्ती एमटीएचएल अटल सेतु, मुंबई ते उलवे रोड, सेक्टर-१२, उलवे नवी मुंबई येथे मोकळ्या जागेत मोकळया जागेमध्ये डेब्रिज टाकण्याच्या प्रयत्नात असताना मिळून आला. यांच्या विरुध्द न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0