कटनी : मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका हिंदू युवतीवर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. गर्भपात करत गोमांस खाण्यास आणि नमाज अदा करण्यास जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तक्रारीनुसार गुरुवारी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलिसांनी आरोपी साबीर अन्सारीला अटक केली आहे. अशा घटनांमुळे लव्ह जिहादची पुनरावृत्ती देशात सुरूच असल्याचे चित्र आहे.
प्रासारमाध्यमानुसार, रंगनाथ नगर पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या पीडितेने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी पीडितेची साबीर अन्सारीसोबत सोशल मीडियावर मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झाले. त्यानंतर साबीरने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले.
याप्रकरणात काही दिवसांतच मुलीचे आणि साबीरचे फोनवर बोलणे सुरू झाले. दोघेही एकमेकांना भेटू लागले. या काळात साबीर आणि पीडितेमध्ये अनेकवेळा शारिरीक संबंध ठेवत साबीर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत गप्प करायचा. यानंतर पीडितेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. साबीरने पीडितेला नमाज अदा करण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडण्यात आले.
दरम्यान, साबीरचे दुसरीकडे विवाह ठरल्याची माहिती पीडितेला समजली. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिने साबरचे घर गाठले होते. त्यावेळी तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर पीडितेने संपूर्ण घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला होता. यावेळी पोलिसांनी पोलीस ठाणे गाठले असून तक्रारीच्या आधारे साबीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
याप्रकरणात पोलिस ठाण्यात प्रभारी रश्मी सोनकर यांनी सांगितले की, साबीर अन्सारी याला रंगनाथ परिसरातील बावली टोला येथून अटक केली. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८७, ६४(१), ६४(२) एम आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.