बांगलादेशात इस्कॉनशी संबंधित बँक खाती गोठवण्याचे आदेश

29 Nov 2024 19:02:46

bangladesh 12

धाका : बांगलादेशातील इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर, अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्कॉन संसथेशी संबंधित १७ जणांचे बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशच्या केंद्रीय बँकेने २९ नोव्हेंबर रोजी हा निर्णय घेतल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट (BFIU) ने ही कारवाई केली आहे.

कार्तिक चंद्र डे, अनिक पाल, सोरोज रॉय, सुशांत दास, बिश्व कुमार सिंघा, चंडीदास बाला, जयदेव कर्माकर, लिपी राणी कर्माकर, सुधामा गौर दास, लख्खन कांती दास, प्रियतोष दास, रुपन दास, रुपन कुमार धर, आशिष पुरोहित, जगदीश चंद. अधिकारी आणि सजल दास या १७ जणांची खाती गोठवण्यात आली आहे. चंदन कुमार धर उपाख्य चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी, यांच्या अटकेनंतर मोठ्या प्रमाणात बांगलादेश येथे निर्दशनं झाली. बांगलादेशातील पोलिस आणि कट्टरपंथीयांनी तिथल्या अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ला करायला सुरूवात केली. BFIU ने बँकांना या व्यक्तींच्या बँक खात्यांवरील सर्व प्रकारचे व्यवहार स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर BFIU ने बँकांना खाते-संबंधित तपशीलवार माहिती, १७ व्यक्तींच्या मालकीच्या व्यवसायांच्या अद्ययावत व्यवहारांच्या नोंदीसह, तीन कामकाजाच्या दिवसांत प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील पोलिसांनी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अटक केली. या अटकेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यामध्ये काही धर्मांधानी जाणीवपूर्वक अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ला चढवला.

Powered By Sangraha 9.0