मुंबई : महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला कौल विरोधकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. हा निकाल स्विकारणार नसल्याची भूमिका काही जणांनी मांडली असून ईव्हीएम वर आपल्या अपयशाचे खापर फोडले जात आहे. अशातच आता यूट्यूबर अभिसार शर्मा खोट्या आकडेवारीचा आधार घेत जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या संबंधी माहिती दिली असताना सुद्धा अभिसर शर्मा समाजात असत्य पसरवणयाचे काम करीत आहेत.
चुकीची माहिती आणि खोटी आकडेवारी यांचा आधार घेत निवडणूक आयोगाच्या हेतुवरच शर्मा यांनी संशय व्यक्त केला. महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा शर्मा यांनी व्यक्त केला. डाव्या विचारधारेच्या लोकांनी केलेले दोषआरोप फेटाळून लावत निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील निवडणुकींच्या मतदानाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात असत्य कथन पसरवले जात आहे.यामध्ये पोस्टल बॅलट मतांची गणना आणि अंतिम निकाल समाविष्ट नसल्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
अभिसार शर्मा आणि फहद अहमद सारख्या लोकांनी काँग्रेस आणि मविआच्या पक्षांची तळी उचलून धरत जाणीवपूर्वक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला असल्याची टिका समाजमाध्यमांवर केली जात आहे.