कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीबाणी

    29-Nov-2024
Total Views |
Water Supply

ठाणे : ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास’ (एमआयडीसी) महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, या काळात ‘ठाणे महापालिका’ क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा ( Water Supply ) पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे या काळासाठी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. पाणी जपून वापरावे, असे आवाहन ‘ठाणे महापालिके’तर्फे करण्यात आले आहे.