वाराणसीच्या ११५ वर्षे जुन्या उदय प्रताप कॉलेजवर वक्फ बोर्डाचा दावा

29 Nov 2024 15:27:33

Woqf
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका ५०० एकर जागेत पदवी महाविद्यालय, आंतरमहाविद्यालय, राणी मुरार कन्या शाळा, राजर्षी शिशु विहार, राजर्षी पब्लिक स्कूल ही शाळा आहे. या महाविद्यालय आणि शाळेत एकूण २० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. उदय प्रताप महाविद्यालयाची स्थापना सुमारे ११५ वर्षांपूर्वी १९०९ मध्ये भिंगा येथील राजा उदय प्रताप सिंह जुदेव यांनी केली होती.
 
१८८९ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य असलेले राजा उदय प्रताप सिंह जुदेव यांनी २५ नोव्हेंबर १९०९ रोजी वाराणसी येथील हेवेत हायस्कूल स्थापन केले. पुढे ते उदय प्रताप सिंह स्वायत्त महाविद्यालयात विकसित करण्यात आले.१९०९ मध्ये त्यांनी उदय प्रताप कॉलेज आणि हेवेट हायस्कूल एंडोवमेंट संस्थेची स्थापना करण्यात आली होती. ज्या अंतर्गत हे कॉलेज चालवले जात आहे.
 
उत्तर प्रदेशच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डीके सिंह यांनी बुधवारी २७ नोव्हेंबर आयएएनएसला सांगितले की, ६ डिसेंबर २०१८ रोजी याप्रकरणी कोणाचा तरी मालकी हक्क हिरावला जात आहे. त्यानंतर वक्फ बोर्डाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे डीके सिंह यांनी माहिती दिली आहे.
 
१ नोव्हेंबर २००१ रोजी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारणारे डॉ. डीके सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती, पदभार स्वीकारल्यानंतर आमच्या विद्यार्थांनी सांगितले की काही लोक मशिदीचे अवैध बांधकाम करत होते. या संबंधित बांधकामासाठी रात्रीच्या वेळी बळजबरीने वाळू आणि सिमेंट आणत होते. मात्र. याला आता सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
मुख्याध्यापक पुढे म्हणाले की. त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली आणि बांधकाम साहित्य मशिदीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, काही दिवसांनी कॉलेजच्या पॉवर लाईनमधून मशिदींमध्ये वापरली जात असल्याची माहिती मिळाली आहे. महाविद्यालयाला त्याचे वीज बिल भरावे लागले. सुमारे एक वर्षापूर्वी, आम्हाला मशिदीचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले होते, असे मुख्यध्यापक म्हणाले.
 
अहवालानुसार, उदय प्रताप कॉलेज कॅम्पसमधील मशीद आणि मकबरा मागील समाजवादी पक्षाच्या सरकारच्या चिथावणीवरून बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. संकुलात असलेल्या मशिदीतही लोक नमाज अदा करण्यासाठी येत असतात असे सांगण्यात आले. दरम्यान, विद्यालयाच्या नजीक असलेली मशीद जुनी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0