भारताशिवाय हिंदुत्व असू शकत नाही : राजा भैया

29 Nov 2024 14:42:29

Raja Bhaiyya Hindu Ekta Padayatra

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Raja Bhaiyya Hindu Ekta Padayatra)
"भारताशिवाय हिंदुत्वाची कल्पना करता येणार नाही. हिंदुत्वाशिवाय भारत असू शकत नाही आणि भारताशिवाय हिंदुत्व असू शकत नाही.", असे मत उत्तर प्रदेशचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया यांनी व्यक्त केले आहे. हिंदूंना संघटित करण्यासाठी बागेश्वर धामचे पीठाधिश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काढलेल्या 'सनातन हिंदू एकता पदयात्रे'दरम्यान ते बोलत होते.

हे वाचलंत का? : ९ दिवसांत १६० किमी! बागेश्वर बाबांच्या 'सनातन हिंदू एकता पदयात्रे'चा समारोप

नऊ दिवस चाललेल्या पदयात्रेचा ओरछा येथे समारोप झाला. यावेळी अनेक राजकीय, धार्मिक, कलाकार मंडळींची रेलचाल पदयात्रेत पाहायला मिळाली. दरम्यान उत्तर प्रदेशचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया यांनीही पदयात्रेत सहभाग घेतल्याचे निदर्शनास आले. रिपब्लिक भारत वृत्तसंस्थेशी बोलताना राजा भैया म्हणाले की, हिंदूंनी संघटित होणे अत्यंत गरजेचे आहे, हीच काळाची हाक आहे. जातीपातीच्या वर उठून हिंदू-हिंदू, भाई-भाईचा नारा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. 'बटेंगे तो कटेंगे' हे वास्तव असून प्रत्येक हिंदू या घोषणेचे समर्थन करतो.
Powered By Sangraha 9.0