कट्टरपंथी हसनने अल्पवयीन मुलीला धर्मांतरण करण्यास केली जबरदस्ती! लव्ह जिहादचे प्रकरण सुरूच

    29-Nov-2024
Total Views |

 love jihad
 
हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोई येथील शाहाबाद तालुक्यातील दरियापूर विक्कू गावात लव्ह जिहादचे (love jihad) प्रकरण समोर आलेले आहे. गुलफाम नावाच्या एका व्यक्तीचा मुलगा हसन या कट्टरपंथीने दिल्लीतील एका १६ वर्षीय मुलीला प्रेम संबंधात अडकवून लग्नगाठ बांधली आहे. आपल्या गावात परत येण्यापूर्वी त्याने तिला २ ते ३ महिने देशाच्या राजधानीत लपवून ठेवले, त्यावेळी कट्टरपंथी युवक तिला एका मशिदीत घेऊन गेला, तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने निकाह करण्यास भाग पाडले गेले. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.
 
आरोपी हा पीडित अल्पवयीन युवती ही दिल्लीतील एका खासगी शाळेत शिक्षण घेत होते. एका वाहिनीच्या जिल्हाध्यक्षांनी याप्रकरणीची माहिती दिली आहे. २७ नोव्हेंबर रो़जी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोलीस एसपींच्या आदेशानुसार, ते गावात पोहोचले असून मुलीची सुटका करण्यात आली. मात्र संबंधित ठिकाणाहून आरोपी फरार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा शोध घेतला आहे.
 
दरम्यान, घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. याप्रकरणाची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना माहिती होती. यावेळी ते म्हणाले की, मला सकाळी कळले की दिल्ली येथे शिक्षण घेणाऱ्या पीडितेला एका मौलवीने तिला शहाबादला आणले होते. तिचे धर्मांतरण करण्यात आले आणि शाहाबाद पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या दरियापूर येथील विक्कू गावात तिच्याशी विवाह करण्यात आला होता.
 
अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईची हमी देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू, आम्ही आधीच एसीपींना पत्र लिहून शहानबाद पोलिस ठाण्याच्या प्रभारींशी बोललो आहोत. गरज पडली तर आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही संपर्क साधू अशी दंडनिहाय कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
हरदोई शहराचे मंडळ अधिकारी अंकीत मिश्रा यांनीही या घटनेतची पुष्टी केली आणि घोषित केले, की गुन्हेगारावरांवर कलम २७ भारतीय न्यायसंहिता आणि उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतरण प्रतिबंध कायदा २०२१ च्या कलम ३/ ५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाबाद पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी याप्रकरणी शोध सुरूच ठेवला आहे.