पुण्यात आगामी काळात होणार्या ‘पुस्तक महोत्सवा’ची उत्सुकता आता दिवसेंदिवस ताणली गेली आहे. गेल्यावर्षी अनेक विश्वविक्रमाची नोंद केलेल्या या ‘पुस्तक महोत्सवा’त यंदा त्या यशाच्या पार्श्वभूमीवर अधिक जोमाने काम केले जाणार असल्याचे संकेत या महोत्सवाच्या भूमिपूजन सोहळ्यात मिळाले. विशेष म्हणजे, त्यापूर्वी जो ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम दि. 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याने वाचन संस्कृतीचा माहोल तयार करण्याचे काम या महानगरात सुरू झाले आहे.
पुण्यात आगामी काळात होणार्या ‘पुस्तक महोत्सवा’ची उत्सुकता आता दिवसेंदिवस ताणली गेली आहे. गेल्यावर्षी अनेक विश्वविक्रमाची नोंद केलेल्या या ‘पुस्तक महोत्सवा’त यंदा त्या यशाच्या पार्श्वभूमीवर अधिक जोमाने काम केले जाणार असल्याचे संकेत या महोत्सवाच्या भूमिपूजन सोहळ्यात मिळाले. विशेष म्हणजे, त्यापूर्वी जो ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम दि. 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याने वाचन संस्कृतीचा माहोल तयार करण्याचे काम या महानगरात सुरू झाले आहे. तसेही सरस्वतीचा आशीर्वाद आणि बुद्धीची देवता श्रीगणेशाची कृपा असलेल्या या पुण्यनगरीत कोणताही चांगला उपक्रम सुरू झाला की, त्याची कीर्ती दूरवर पसरते. हा महोत्सव गेल्यावर्षी लोकप्रिय झाल्यानंतर तो आमच्या देशातदेखील घ्या, अशी अनेक देशांकडून ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’कडे मागणी करण्यात आली, हेच या महोत्सवाचे यश. यंदा तर संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर आधारित पुस्तके आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्याची किंबहुना जनतेला आणि भावी पिढ्यांना गेल्या अनेक काळापासून दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्याला संविधानाचे महत्त्व पटवून देण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
असा हा महोत्सव सर्वार्थाने उपयुक्त असा ठरणार आहे. वाचन प्रेमी ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी तो उपयुक्त तर असेलच. मात्र, लहान मुलांमध्ये आणि तरूणांमध्येदेखील यातून ज्ञानसंपादनाचा हेतू साध्य केला जाण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. कालच्या एका छोटेखानी कार्यक्रमातूनच यासाठी अनेक उद्बोधक गोष्टी उदयास आल्या आहेत. खासदार, आमदारांनी सूचना करतानाच आयोजकांनीदेखील त्या सूचनांचे पालन करून सर्वांसाठी प्रेरक आणि ज्ञानवर्धक हा उत्सव होईल, याबाबत प्रयत्न आणि नियोजन केले जाणार असल्याचे जाहीर केले. यात लहान मुलांसाठी वाचन कट्ट्याची निर्मिती, वाचन संस्कृती लहान वयातच रूजावी म्हणून बालनाट्य तसेच मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाला असताना यानंतर या भाषेच्या लोकप्रियेतेसाठी करावयाची कामे आणि त्यासाठी नियोजन करणे, याबाबत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ऋतुप्रेम
पुणे जिल्ह्यावर कोण प्रेम करीत नाही बरे? जो कोणी पुण्यात येतो, तो या शहराच्या प्रेमातच पडतो. आता तर पुण्याचा विस्तारदेखील झपाट्याने होत आहे. नजीकची गावे पुण्यात समाविष्ट झाल्याचे गेल्या दशकात आपण बघत आलो आहोत. त्यामुळे या भागात सोयी-सुविधांचीदेखील तितकीच तजवीज केलेली असते. पायाभूत सुविधा आणि विकासामुळे नागरिकांनादेखील या परिसराने आपलेसे केले. ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे तर कायमच आकर्षण राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुण्यभूमी आता बदलत्या काळातदेखील कालसुसंगत अशी विकसित होत असल्याचे बघायला मिळत आहे. या शहराच्या प्रेमात माणसासोबत पशुपक्षी आणि निसर्गदेखील पडला असल्याचे आपल्या लक्षात येईल. विविध प्रकारचे पक्षी येथे अन्य देशातून स्थलांतरित होत असतात. पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणीच. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी अनेक पर्यटक आणि पक्षीप्रेमी दाखल होतात. अलीकडे तर पर्यटन उद्योगाला चालना मिळत असल्याने ठिकठिकाणी या ऋतूत पर्यटनासाठी थेट पुण्याहून महाबळेश्वर आणि कासपठार शिवाय कोकण, गोव्याचा निसर्ग पाहण्यासाठी लाखोंच्या सहकार्याने पर्यटन येत असतात. लोक आता बघा ना, गेल्या काही दिवसांपासून थंडीने पुणेकरांना आपल्या विळख्यात घेतले आहे. आठ डिग्री सेल्सियसपर्यंत गेलेल्या महानगराच्या तापमानातून थंडीचे या शहरावरील प्रेम लक्षात येईल. पाऊस काही कमी नव्हता. त्यानेदेखील असा धसमुसळेपणा केला की, जिल्ह्यात या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद यावेळी झाली. उन्हाची तीव्रतादेखील पुणेकर अनुभवत आहेत.
हे ऋतू जसे पुण्यावर प्रेम करतात, तसे पुणेकरदेखील या ऋतुंना स्वीकारताना दिसून येत आहे. अलीकडे समाजमाध्यमे आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ‘योग दिन’ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्यापासून सुजाण नागरिकांना आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिक पहाटेच योगसाधनेत आणि व्यायाम क्रियेत दंग झालेले खुली मैदाने, टेकड्यांवर दिसून लागली आहेत. खाद्यप्रेमींनादेखील हिवाळ्यातील आहाराचे महत्त्व उमजल्याचे लक्षात येईल. येथून तयार झालेल्या पदार्थांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविली आहे. तथापि पुणेकरांचे हे ऋतुप्रेम पुणेकरांसाठीदेखील अनुकरणीय ठरावे.
अतुल तांदळीकर