‘मेगा प्रोजेक्टस’चे युग...

29 Nov 2024 22:29:30

Megha Project
 
आज संपूर्ण जगभरात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. जगभरातील ‘मेगा प्रोजेक्ट’चा आढावा घेतल्यास त्यापैकी बरेचसे प्रकल्प अलीकडे आखाती प्रदेशात सुरु असल्याचे दिसून येते. कन्स्ट्रक्शन सॉफ्टवेअर कंपनी ‘बिल्ड’चा अंदाज आहे की, या दशकाच्या समाप्तीपूर्वी जगातील पहिला बांधकाम ‘मेगा प्रोजेक्ट’ आकारास येईल, ज्याची किंमत अंदाजे एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. सध्या, 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आकाराचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी दहा अब्ज डॉलर्स बांधकाम प्रस्तावांना ‘मेगा प्रोजेक्ट’ मानले जात होते.
 
आज संपूर्ण जगभरात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. जगभरातील ‘मेगा प्रोजेक्ट’चा आढावा घेतल्यास त्यापैकी बरेचसे प्रकल्प अलीकडे आखाती प्रदेशात सुरु असल्याचे दिसून येते. कन्स्ट्रक्शन सॉफ्टवेअर कंपनी ‘बिल्ड’चा अंदाज आहे की, या दशकाच्या समाप्तीपूर्वी जगातील पहिला बांधकाम ‘मेगा प्रोजेक्ट’ आकारास येईल, ज्याची किंमत अंदाजे एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. सध्या, 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आकाराचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी दहा अब्ज डॉलर्स बांधकाम प्रस्तावांना ‘मेगा प्रोजेक्ट’ मानले जात होते.
 
‘जागतिक प्रकल्प सर्व्हेक्षण कंपनी बिल्ड’, ‘इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन मॅगझीन’ आणि ‘कन्स्ट्रक्शन रिव्हिव्ह’द्वारे ‘मेगा प्रोजेक्ट’ म्हणून ओळखण्यात आलेल्या नऊ ‘मेगा प्रोजेक्ट्स’पैकी 100 अब्ज किंवा त्याहून अधिक खर्चाचे, चार प्रकल्प आखाती देशांमध्ये बांधले जात आहेत. यामध्ये निओम सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा देखील समावेश आहे. प्रत्यक्षात वायव्य सौदी अरेबियामध्ये बांधल्या जाणार्‍या भविष्यकालीन शहरांची उभारणी यामध्ये केली जाते आहे. हा प्रकल्प नुकताच अधिक विस्तारण्यात आला आहे. त्यात 2030 सालापर्यंत सुमारे तीन लाख लोक राहतील, असा अंदाज आहे. या आखातावर सुरू असलेले इतर ‘मेगा प्रोजेक्ट’ सौदी अरेबियातील जेद्दाहच्या उत्तरेकडील किंग अब्दुल्ला इकोनॉमिक सिटी आणि उत्तर कुवेतमधील सिल्क सिटी आहेत, जे भविष्यातील जगातील सर्वात उंच इमारतीचे घर असेल.
 
निओम सिटीपेक्षा महाग ‘ट्रान्स-युरोपियन ट्रान्सपोर्ट’ नेटवर्क हा प्रकल्प आहे. अंदाजे 600 अब्ज डॉलर्स खर्चाच्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा अपग्रेडमध्ये लांब-अंतराची वाहतूक सुधारण्यासाठी युरोपियन युनियन सदस्य देशांमध्ये रेल्वे मार्ग, रस्ते, शिपिंग मार्ग आणि संबंधित संरचनांचा समावेश आहे. जीसीसी सदस्य देशांना रेल्वेने जोडण्यासाठी 250 अब्ज डॉलर्स, दोन हजार किमीच्या प्रकल्पाप्रमाणे द्वीपकल्पावरील इतर प्रकल्पांनाही धक्का बसला आहे. हा प्रकल्प सुरुवातीला 2018 सालपर्यंत पूर्ण करायचे नियोजन होते. मात्र, मधल्या काळात हा प्रकल्प रखडला. या प्रदेशातील एक ‘मेगा प्रोजेक्ट’ जो अंशतः रद्द करण्यात आला होता. 64 अब्ज डॉलर्स खर्चाचा प्रकल्प तो म्हणजे ‘मनोरंजन आणि पर्यटन संकुल दुबई लॅण्ड’ हा प्रकल्प आहे.
 
अब्जावधींचे हे प्रकल्प पाहता, आता ते दिवस गेले जेव्हा लोक दहा दशलक्ष डॉलर्स ते 50 किंवा 100 दशलक्ष डॉलर्स खर्चाच्या प्रकल्पांनी प्रभावित होत होते. पण, तरीही हे केवळ पुढच्या काही दशकात होणार्‍या प्रचंड ‘मेगा प्रोजेक्ट’ वाढीसह शाश्वत आणि पर्यावरणपूरकता याकडेही जगणे लक्ष वेधले आहे. जसजसे, लोक ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतरित होतात, तसतसे शहरातील लोकसंख्या वाढत जाते. या वाढत्या अर्थव्यवस्थांमधील रहदारी, पाणी, सांडपाणी, वीज आणि जीवनमान व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या सुधारणांची मागणी वाढते.
 
‘मेगा प्रोजेक्ट्स’च्या वाढत्या यादीमध्ये बोगदे, पूल, धरणे, महामार्ग, विमानतळ, रुग्णालये, गगनचुंबी इमारती, क्रूझ जहाजे, विंड फार्म्स, ऑफशोअर ऑईल आणि गॅस रिग्स, ल्युमिनियम स्मेल्टर्स, कम्युनिकेशन सिस्टम्स, ऑलिम्पिक गेम्स, एरोस्पेस मिशन्स, संपूर्ण नवीन शहरे, नवीन पार्टिकल ऍक्सेलर यांचा समावेश आहे. आशियाई राष्ट्रांनीही यामध्ये आघाडी घेतली आहे. 2015 साली, चीनने ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक’ तयार करण्याची घोषणा केली. जगभरातील हे सर्व ‘मेगा प्रोजेक्ट’ जसजसे उलगडत जातात, तसतसे आपण मागील चार हजार वर्षांपेक्षा पुढील 40 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करू शकतो. या सुविधा उभारताना पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार्‍या कामगारांना दिलेले वेतन स्थानिक अर्थव्यवस्थेत एका उच्च मर्यादेत सुधारेल, जिथे इतर ‘मेगा प्रोजेक्ट’ व्यवहार्य होतील. प्रकल्पांबाबत जागरुकता जसजशी सुधारते, तसतसे इतर जगाला उत्कृष्ट बनवण्याची आणि प्रभावित करण्याची देशांची इच्छा वाढते. आज आपण तांत्रिक बेरोजगारीच्या युगात जात आहोत. मात्र, या प्रकल्पांतून नवीन नोकर्‍यांची निर्मितीही होते. म्हणूनच आज जगभरात विकास प्रकल्पांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होताना दिसतो.
 
 
Powered By Sangraha 9.0