बांगलादेशात १७ हिदूंच्या बँकांची खाती गोठवण्याचे निर्देश केले जारी

29 Nov 2024 21:02:02

 Hindus
 
ढाका : बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय सोसायटी फॉर कृष्णा चेतना इस्कॉनच्या क्रॅकडाऊन दरम्यान, देशाच्या सरकारी बँकांनी हिंदू संघटनेशी संबंधित १७ बांगलादेशी हिंदूंची बँक खाती गोठवली आहेत. मिळालेल्या अहवालानुसार, बांगलादेशात बँकेच्या शाखा असलेल्या बांगलादेश फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिटने बँकांना इस्कॉन, बांगलादेशशी संबंधित १७ लोकांची खाती गोठवण्याचे निर्देश जारी केले आहेत.
 
१७ लोकांमध्ये इस्कॉनचे माजी नेते चंदन कुमार धर यांचा समावेश आहे. ज्यांना चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी म्हणून ओळखले जाते. ज्यांच्या अटकेमुळे हिंसाचार झाला आणि चितगाव येथील वकील सैफुल इस्लामची हत्या करण्यात आली. कार्तिक चंद्र डे, अनिक पाल, सोरोज रॉय, सुशांत दास, विश्व कुमार सिंघा, चंडीदास बाला, जयदेव कर्माकर, लिपी राणी कर्माकर, सुधामा गौस दास, लख्खन कांती दास, प्रियतोष दास, रुपन कुमार धर, बीएफआययूने लक्ष्य केलेल्या इतर लोकांचा यामध्ये समावेश आहे.
 
BFIU ने बँकांना या व्यक्तींची बँक खात्यांवरील सर्व प्रकारचे व्यवहार स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाने मनी लँडरिंगविरोधी कायदा, २०१२ च्या कलम २३ (१) )(c) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांतर्गत हा आदेश जारी केला आहे. त्यात असे नमूद केले आहे की, खात्यांमधील करण्यात आलेला व्यवहार इस्कॉन आणि त्यांच्याशी संबंधित संस्था आणि त्यांच्या मालकीच्या आस्थापनांना ३० दिवसांसाठी निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी बांगलादेश पोलिसांनी इस्कॉनचे माजी साधू चिन्मय दास यांना देशद्रोहाच्या या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांच्या या अटकेमुळे देशात प्रचंड निदर्शने झाली आहेत. अशा निषेधाचे रुपांतर मंगळवारी चितगाव येथे झालेल्या पोलिसांच्या चकमकीमध्ये वकील सैफुल इस्लाम, हिंसाचार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी अनेक हिंदूवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0