उदय प्रताप कॉलेजवर वक्फचा दावा! परिसरात अवैध मशिदीचे बांधकाम

    28-Nov-2024
Total Views |

uday pratap

लखनौ: वक्फ बोर्डाची दावेदारी दिवसेंदिवस वाढत असताना, वाराणासी इथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश वक्फ बोर्डाने वाराणसी येथील प्रसिद्ध उदय प्रताप महाविद्यालयाच्या (यूपी कॉलेज) मालमत्तेवर दावा केला आहे. लखनौ स्थित यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने यूपी कॉलेजच्या जमिनीवर वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे सहाय्यक सचिव आले अतीक यांनी २०१८ मध्ये वक्फ कायदा १९९५ अंतर्गत कॉलेज मॅनेजरला नोटीस पाठवली होती. नोटीसमध्ये म्हटले आहे की वसीम अहमद रहिवासी भोजुबीर तहसील सदर, वाराणसी यांनी म्हटले आहे की, गाव छोटी मस्जिद नवाब टोक मजारत हुजरा उदय प्रताप कॉलेज भोजुबीरची मालमत्ता महाविद्यालयाच्या ताब्यात आहे. सुन्नी बोर्डाच्या कार्यालयात त्याची नोंदणी करावी, तसेच या नोटीसीला १५ दिवसांत उत्तर द्यावे असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. यूपी कॉलेजचे प्राचार्य डॉ डीके सिंह यांनी बुधवारी २७ नोव्हेंबर) माध्यमांना सांगितले की, नोटीस ६ डिसेंबर २०१८ रोजी पाठवण्यात आली होती. यावर २१ डिसेंबर २०१८ रोजी उत्तर देण्यात आले. हे ट्रस्ट चालवते असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यावर कोणाचा तरी मालकी हक्क हिरावला जातो. त्यानंतर वक्फ बोर्डाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे डीके सिंह यांनी सांगितले.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार उदय प्रताप कॉलेज कॅम्पसमधील मशीद आणि मकबरा पूर्वीच्या समाजवादी पक्षाच्या सरकारच्या चिथावणीवरून बांधण्यात आला होती. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदा असल्याचे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. संकुलात असलेल्या मशिदीतही लोक नमाज अदा करण्यासाठी येतात, असे सांगितले जाते. त्याच वेळी, कबरेजवळ नेहमीच एक व्यक्ती असते. यामध्ये कॉलेजपेक्षा मशीद जुनी असल्याचा अजब दावा काही लोकांकडून केला जातो.