रिलायन्स डिजिटलची ग्राहकांसाठी विशेष ऑफर; 'ब्लॅक फ्रायडे सेल' अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापरण्याचे आवाहन

28 Nov 2024 18:01:09
reliance digital special offer sale


मुंबई : 
     बहुप्रतीक्षित रिलायन्स डिजिटलचा डील ऑफर ब्लॅक फ्रायडे सेल अखेरीस ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२४ पर्यंत स्पेशल डील ऑफर ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, MyJio स्टोअर्स व रिलायन्स डिजिटलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.




ब्लॅक फ्रायडे सेलच्या माध्यमातून स्मार्टफोन, लॅपटॉप, होम अप्लायन्सेस आणि बरेच काही यासह इलेक्ट्रॉनिक्सच्या विविध प्रकारच्या ऑफरसह ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यंदाच्या सेलमध्ये ग्राहकांना आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक व वनकार्ड या निवडक डेबिट व क्रेडिट कार्ड्सवर १० हजारांपर्यंत सूट मिळू शकते.

विशेष म्हणजे बजाज फिनसर्व्ह आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या वित्त भागीदारांकडून २२,५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. रिलायन्स डिजिटलच्या विशेष ऑफरच्या माध्यमातून iPhone 16 सारखा महागडा स्मार्टफोन अविश्वसनीय किमतीत उपलब्ध होऊ शकतो. तर या मर्यादित-वेळच्या ऑफर संपण्यापूर्वी तंत्रज्ञानातील सर्वोत्तम खरेदी करण्यासाठी रिलायन्स डिजिटलतर्फे ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.









Powered By Sangraha 9.0