नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरात पुन्हा एकदा जोरदार धमाका झाला आहे. २८ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. बंसी स्वीट्सच्या दुकानाबाहेर हा धमाका झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. महिन्याभरा पूर्वी शाळेच्या परिसरात अशाच पद्धतीचा ब्लास्ट झाला होता. उद्यानाच्या सीमा भिंतीजवळ ही घटना घडल्याची माहिती माध्यमांना मिळाली. या परिसरात विखुरलेल्या व्हाईट पाऊडरचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले.
या स्फोटात एक जण किरकोळ जखमी झाला असून, त्या स्फोटकाचा प्रकार करू शकलेला नाही. या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. गेल्या महिन्यात, रोहिणीच्या प्रशांत विहारमधील सीआरपीएफ शाळेच्या भिंतीवर जोरदार स्फोट झाला होता, ज्यामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला होता. घटनास्थळी पोलिसांना सफेद पाऊडर मिळाली आहे, जिचा शोध सुरू आहे.