मुंबई , दि. २८ : पॉल डिमेलो यांचे ‘विस्मृतीतील पाने’ हे चित्रप्रदर्शन २५ नोव्हेंबर पासून जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे. १ नोंव्हेबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
पॉल डिमेलो यांचे आयुष्य निसर्गसंपन्न अशा वसई तालुक्यात गेले. त्यांच्या जन्म शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचा निसर्गाशी अगदी घनिष्ट संबंध होता. बदलत्या काळासोबत बदलत गेलेल्या गोष्टी अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या. त्यात बदललेले जीवन, घरे, लोकांचे राहनीमान, काम करण्याची पद्धत आणि एकंदरीत बादलेली समाजव्यवस्था यांचा समावेश आहे. काळ जरी बदलत गेला असला तरी जुन्या काळातील लोकांनी एक समृद्ध वारसा जतन करून ठेवला होता. या वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी पॉल डिमेलो यांनी ‘विस्मृतीतील पाने’ ही चित्रे काढली आहेत. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आणि नष्ट होत चाललेल्या अनेक गोष्टी त्यांच्या या चित्रांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.