नौदलाचे बळ वाढले, 'आयएनएस अरिघात'वरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

28 Nov 2024 18:13:59

arighaat
 
नवी दिल्ली : (INS Arighaat) भारतीय नौदलाने आयएनएस अरिघात या पाणबुडीवरून ३,५०० किमी अंतराच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या के४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताची मारकक्षमता सिद्ध करणारी आहे.
 
भारतीय नौदलासाठी बुधवार २७ नोव्हेंबर हा ऐतिहासिक दिवस होता. भारतीय नौदलाने अलीकडेच आपल्या ताफ्यात समाविष्ट केलेल्या 'आयएनएस अरिघात' या पाणबुडीवरून ३,५०० किमी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. के४ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताची प्रहार क्षमता सिद्ध झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नौदल आता अनेक क्षेपणास्त्र प्रणालींच्या आणखी चाचण्या घेणार आहे.
 
कोलकत्ता ते बीजिंग हे हवाई अंतर अंदाजे ३,२७७ किलोमीटर आहे. बंगालच्या उपसागरातून प्रक्षेपित केल्यास ते चीनच्या मुख्य भूभाग, दक्षिण आणि पश्चिम भागात सहज पोहचू शकते आणि आवश्यक असल्यास ते थेट बीजिंगलाही धडकू शकते. मुंबई ते इस्लामाबाद हे हवाई अंतर १६०० किलोमीटर आहे आणि जर ते अरबी समुद्रात कुठूनही सोडले गेले तर ते पाकिस्तानची राजधानी उद्ध्वस्त करू शकते. विशेष म्हणजे आयएनएस अरिघात येथून याचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ही पाणबुडी पाण्याखाली दीर्घकाळ काम करू शकते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0