नवी मुंबईतील सानपाडा येथील इमारतीला आग!

28 Nov 2024 17:58:00

sanpada 
  
मुंबई : (Sanpada) नवी मुंबईतील सानपाडा परिसरात २८ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी भूमीराज कॉस्टॅरिका टॉवर (Bhumiraj Costa Rica) च्या १२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर असणाऱ्या खासगी कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
  
ही घटना सानपाडा पामबीच रोड वरील मोराज सर्कल परिसरातील आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कालच २७ नोव्हेंबरला मुंबई मध्ये अंधेरी आणि डोंगरी भागातील रहिवासी इमारतीमध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0