CA च्या घरावर छापा, ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला!

28 Nov 2024 16:47:30
  
ca ed raid

नवी दिल्ली :
दिल्लीतील बिजवासन परिसरात सायबर फसवणूक प्रकरणात, एका सीएच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ईडीचे अतिरिक्त संचालक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सीए अशोक शर्मा यांच्या टीमने ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांच्यातील ५ जणं घटनास्थळी होते. चौघांना पकडण्यात यश आले असून, एका आरोपीला पळून जाण्यात यश आले आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विशेष पथकाने केलेल्या छापे मारीत, सायबर फिशिंग घोटाळे, क्यूआर कोड फसवणूक आणि अर्धवेळ नोकरी घोटाळ्यांसह हजारो सायबर गुन्ह्यांमधून व्युत्पन्न केलेल्या बेकायदेशीर निधीची लाँड्रिंग उघडकीस आले आहे. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले ज्यांचा वापर क्रिप्टो करंसी विकत घेण्यासाठी केला जात असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.घटनास्थळावरून थेट ईडीचे पथक पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले, पळून गेलेल्या आरोपीचा तपास सुरू आहे.

 
Powered By Sangraha 9.0