सिंधुदुर्ग किल्यांच्या सागरी परिक्षेत्रात कचऱ्याचा खच; समुद्राबाहेर काढला २५० किलो कचरा

28 Nov 2024 20:07:32
Marine Debris Cleanup



मुंबई (विशेष प्रतिनिधी)
- सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या सागरी परिक्षेत्रामधून २५० किलो कचरा समुद्राबाहेर काढण्यात आला (Marine Debris Cleanup). बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी पाणबुड्यांच्या मदतीने ही कामगिरी करण्यात आली (Marine Debris Cleanup). विविध संस्थांनी ही एकत्र मिळून ही समुद्राखालची स्वच्छता मोहिम राबवली. (Marine Debris Cleanup)
 


महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभाग, फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया (मुंबई), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मालवण नगर परिषद, नीलक्रांती, यूथ बीट्स फॉर एन्व्हायर्नमेंट, मालवण टुरिस्ट ग्रुप, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि वनशक्ती या संस्थांनी मिळून मालवण तालुक्यात समुद्राखालच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. समुद्र तळाशी साठलेला कचरा गोळा करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सागरी परिक्षेत्रामध्ये ही मोहिम पार पाडली. यासाठी पाणबुड्यांचाी मदत घेण्यात आली. सात पाणबुड्यांनी समुद्रतळाशी जाऊन कचरा गोळा केला.
 
 
समुद्राखालून गोळा केलेल्या या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने समुद्रात वाहून गेलेल्या जाळ्या (घोस्ट नेट) दोरखंड, प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचा समावेश होता.या मोहिमेदरम्यान एकूण 5,000 चौरस मीटर क्षेत्राची सफाई करण्यात आली. यामाध्यमातून २५० किलो कचरा गोळा करण्यात आला. यामोहिमेत एकूण ५० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0