मुंबई : सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत, असा खोचक टोला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्ट सुप्रिया सुळे. आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका. जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा. जनतेने तुम्हाला का नाकारले आहे यावर चिंतन करा. कारण सध्या तुमचं 'सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही', असं झालं आहे," अशी टीका त्यांनी केली.