२८ डिसेंबर, मुंबई : जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटी आयोजित कै. विकास धुमे स्मरणार्थ ‘राज्यस्तरीय मराठी बालनाट्य महोत्सव २०२४’ च्या मुंबई केंद्राच्या प्राथमिक फेरीला आजपासून (२८ नोव्हेंबर) पासून सुरुवात झाली आहे. २८ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेत ‘हरवली पाखरे’, ‘मुंग्या’, ‘अदिती’, ‘जादुचा दिवा’, ‘म’ २९ नोव्हेंबर रोजी ‘सुलू’, ‘होते कुरूप वेडे’, ‘असा बालगंधर्व आता न होणे’, ‘तिमिरातूनी तेजाकडे’ आणि ३० नोव्हेंबर रोजी ‘रोज हवे नवे नवे’, ‘रक्तरेष एक नवीन सुरुवात’, ‘संगीत H2O’ ‘मधली सुट्टी’, ‘आये’ आणि ‘सरणार कधी,तम’ इत्यादी बालनाट्य सादर होणार आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी २४ आणि २५ डिसेंबर रोजी ‘जे. ई. एस. शिक्षण संकुल, अरविन्द गंडभीर हायस्कूल जोगेश्वरी (पूर्व) ४०००६०’ येथे होणार आहे.