घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद! ब्लॅकमेल करणाऱ्या नौशाद जामदारवर गुन्हा दाखल

किरीट सोमय्यांची माहिती

    28-Nov-2024
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : घाटकोपरमध्ये लव्ह जिहादची घटना पुढे आली आहे. १८ वर्षीय हिंदू मुलीला फसवत तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नवशाद मेहबूब जमादारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी याबाबतची माहिती दिली.
 
 
 
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय पीडित मुलगी ब्युटी पार्लरचा कोर्स करत होती. दरम्यान, नौशाद मेहबुब जामदार नावाच्या मुलीशी तिचा संपर्क आला. त्यानंतर तिच्या आईवडीलांना ही गोष्ट कळली असता त्यांनी तिला समज दिली. ही गोष्ट नौशादला कळल्यावर त्याने पीडित मुलीला फोन केला आणि तिच्या आईशी बोलत त्यांना भेटायला बोलवले. त्यानंतर तो मुलीच्या आईला म्हणाला की, तुमच्या मुलीसोबत माझे अफेयर असून तिचे खाजगी फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत. तसेच ते फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसच्या आमदारांनी भाजपममध्ये विलीन व्हावं; आशिष देशमुखांचे विधान
 
पीडितेच्या आईने ते फोटो डिलीट करण्यास सांगितल्यानंतर त्याने ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे दिल्यानंतरही तो पिडीतेच्या मागे लागला होता. त्यामुळे आमच्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका असल्याचे पीडितेच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे.