पुणे, २८ नोव्हेंबर : लेखक उपमन्यू चॅटर्जी यांना त्यांच्या ‘लॉरेजो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाईफ’ या पुस्तकासाठी यावर्षीचा जेसीबी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. 23 नोव्हेंबर रोजी जेसीबीच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्कारासाठी विचार करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये शरणकुमार लिंबाळे लिखित आणि प्रॉमिता सेनगुप्ता अनुवादित ‘सनातन’, सक्यजित भट्टाचार्य लिखित आणि ऋतुपर्ण मुखर्जी अनुवादित ‘द वन लेग्गड’, साहरू नुसाईबा कन्ननारी लिखित ‘क्रॉनिकल ऑफ अ आवर अँड अ हाल्फ’, संध्या मेरआय लिखित आणि जयश्री कलाथिल अनुवादित ‘मरिया, जस्ट मरिया’ या पुस्तकांचा समावेश होता.