२८ नोव्हेंबर, पुणे : उन्मेष तर्फे भावगीत / सुगम संगीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकल गीतगायन, युगुल गीतगायन आणि समूह गीत गायन अशा तीन स्पर्धा होणार आहेत. या तिन्ही स्पर्धा ६ ते १४, १५ ते ४५ आणि ४५ ते त्यावरील अशा तीन गटांमध्ये होणार आहेत. एकल गीतगायन, युगुल गीतगायन आणि समूह गीतगायन या तिन्ही स्पर्धांसाठी सहभाग शुल्क अनुक्रमे २००, ३०० आणि ५०० रुपये असणार आहे. एकल गीतगायन स्पर्धेतील विजयी स्पर्धकाला १००० रुपये आणि उपविजेत्या स्पर्धकाला ५०० रुपये, युगूल गीतगायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला २ हजार रुपये आणि उपविजेत्या स्पर्धकाला दिड हजार रुपये आणि समूह गीत गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला २५०० रुपये आणि उपविजेत्या स्पर्धकाला २००० रुपये अशी पारितोषिके असणार आहेत.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी करण्याची आणि व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख आहे १५ डिसेंबर आहे. प्राथमिक फेरीचा निकाल ३१ डिसेंबर रोजी लागणार आहे. प्राथमिक फेरीतील प्रत्येक गटातून ५ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी होईल. अंतिम फेरीमध्ये स्पर्धकांना पुण्यात येऊन प्रत्यक्ष सादरीकरण करावं लागेल. त्यातून विजेता आणि उप विजेता निवडले जातील.अंतिम फेरीसाठी संगीत क्षेत्रातील प्रथितयश मान्यवर कलाकार हे परीक्षक म्हणून असतील. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल व त्यांचे मौलिक विचार ऐकण्याची सुसंधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ.आनंद कुळकर्णी (९८८१४४०३४५), आरुशी दाते (९५२७७४०३४५) यांच्याशी संपर्क साधावा.