मुंबई (विशेष प्रतिनिधी) - हिंगोली तालुक्यातील येलदरी वनउद्यानामधून फुलपाखरांच्या ३६ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे (yeldari forest park). या नोंदी कोण्या अभ्यासकाने केल्या नसून या क्षेत्रात काम करणाऱ्या वन विभागाच्या वनरक्षकांनी या नोंदींसाठी पुढाकार घेतला (yeldari forest park). यासंदर्भातील शोधनिबंध देखील त्यांनी शास्त्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित केला आहे. वनकर्मचाऱ्यांकडे समाजातील काही लोकं नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात (yeldari forest park). अशा परिस्थितीत वनकर्मचारी देखील शास्त्रीय नोंदी करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. (yeldari forest park)
हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामध्ये येलदरी वनउद्यान आहे. येलदरी धरणाच्या शेजारीच हे उद्यान वसले आहे. वन विभागाच्या मालकीच्या या उद्यानात साधारण ८ हेक्टर क्षेत्रावर वनपर्यटन केले जाते. या उद्यानात फुलपाखरांचा वावर लक्षात आल्यानंतर येथील वनरक्षक गणेश कुरा यांनी या फुलपाखरांच्या निरीक्षणाचे काम सुरू केले. साधारण हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी न नोंदवलेली फुलपाखरे त्यांना वनउद्यानात आढळून आली. त्यामुळे कुरा यांनी येथील फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आपल्या सहकारी वनरक्षक रुजिता शेलार यांना सोबत घेतले. फुलपाखरांची ओळख पटवण्यासाठी हिंगोलीचे पक्षीअभ्यासक अनिल उरटवाड यांची मदत घेतली. या माध्यमातून या तिघांनी मिळून आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये ३६ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली. या नोंदीचे वृत्त 'इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन लाईफ सायन्सेस' या नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
वनरक्षकांकडून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फुलपाखरांच्या नोंदी घेतल्या जात असत. भटक्या, पांढरा शेंदुरटोक्या, अशोकास्तक, कवडा, निलींब, छोटा चांदवा, तमिळ छाया, रुपरेखा कानेरी, एरंडक, कवडया, तृण पिलासी, लघु पांडव, निलभिरभिरी, बहुरुपी, पितनेत्री भिरभिरी, पट्टेरी कवडा, धान तडतडया, त्रिमंडल, निल रुईकर सांजपरी, हबशी, पट्टेरी तुतारी, कृष्ण कमलिनी, पट्टेरी रुईकर, लिंबाळी ही मराठी नावे असलेली फुलपाखरे त्यांना वन उद्यानात आढळून आली. यातील वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत दुसऱ्या श्रेणीत संरक्षित असलेले ‘किरमिजी मदालस’ (Crimson Rose) हे फुलपाखरू देखील वनउद्यानात आढळले. या कामासाठी हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाले, सहाय्यक वनसंरक्षक सचिन माने, सेनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, वनपाल गजानन चाटे यांची साथ मिळाली.