आरक्षणासाठी हिंदू म्हणवून घेणे हा संविधानाचा विश्वासघात!

27 Nov 2024 16:42:59
supreme-court-denies-sc-caste-certificate


नवी दिल्ली :
      स्वतःला दलित म्हणवून घेऊन आरक्षणाचा लाभ घेणे, हे भारतीय संविधानाचा विश्वासघात करण्यासारखे आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ख्रिश्चन म्हणून जन्माला आलात परंतु, आरक्षणाच्या नोकरीसाठी दलित झालात हे संविधानाच्या तत्त्वज्ञानाचा विश्वासघात आहे, असे सांगत आरक्षण मागणाऱ्या महिलेस फटकारले आहे.




दरम्यान, हे प्रकरण पुद्दुचेरी येथील एका ख्रिश्चन महिलेशी संबंधित असून सी सेलवरानी नावाच्या महिलेने ती जन्मत: हिंदू आहे, असा दावा न्यायालयात केला. तिचे आई-वडील वल्लुवन जातीचे असून याच आधारावर त्यांनी आरक्षण मागितले होते. मात्र, ती ख्रिश्चन असून केवळ नोकरीच्या निमित्ताने ती दलित असल्याचा दावा करत असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे ख्रिश्चन महिलेने दलित असल्याचा दावा करत आरक्षणाची मागणी केली होती. महिलेने दावा की, ती ख्रिश्चन आहे, परंतु ती हिंदू धर्मावर विश्वास ठेवते आणि दलित आहे. त्यामुळे आरक्षण दिले पाहिजे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने तिचा हा दावा फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.

ही महिला केवळ नोकरी मिळवण्यासाठी दलित हिंदू असल्याचा दावा करत आहे. सुनावणीदरम्यान पुराव्यावरून ती ख्रिश्चन असल्याचे दिसून आले. केवळ पैसा कमावण्यासाठी स्वत:ला दलित हिंदू म्हणवून घेणे आणि त्यावर विश्वास न ठेवणे हे संविधानाच्या विरोधात असल्याचे यावेळी न्यायालयाने म्हटले आहे.







Powered By Sangraha 9.0